कोलकाता नाईट रायडर्सने रचला इतिहास! मुंबई इंडियन्सचा वानखेडेवरही खेळखंडोबा

WhatsApp Group

IPL 2024 MI vs KKR : मुंबई इंडियन्सची आयपीएल 2024 मधील खराब कामगिरी सुरुच आहे. वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी पराभव केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईचा हा आठवा पराभव ठरला. तब्बल 12 वर्षांनी केकेआरने मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या मुंबईने कोलकाताला 169 धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात केकेआरच्या गोलंदाजांनी जबरदस्त मारा करत मुंबईची फलंदाजी उद्ध्वस्त केली. मुंबईचा संपूर्ण संघ 145 धावांवर ऑलआऊट झाला. केकेआरने पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

मुंबईकडून एकट्या सूर्यकुमार यादवने झुंज दिली. सूर्याने 56 धावा केल्या. स्पर्धेतील महागडा गोलंदाज ठरलेल्या मिचेल स्टार्कने 33 धावांत 4 बळी घेत मुंबईचे कंबरडे मोडले. वरुण चक्रवर्ती, सुनील नरिन आणि आंद्रे रसेल यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या. तत्पूर्वी नुवान तुषारा आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने केकेआरला 169 धावांवर ऑलआऊट केले. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने 6 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावांची खेळी केली. तर इम्पॅक्ट प्लेअर मनीष पांडेने 42 धावा जमवल्या. जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स काढल्या. हार्दिक पांडयाला 2 विकेट्स मिळाल्या.

हेही वाचा – Health Insurance घेणाऱ्यांना धक्का, पॉलिसीचा प्रीमियम 10 ते 15% वाढणार!

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – इशान किशन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कप्तान), नमन धीर, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

कोलकाता नाइट रायडर्स – सुनील नरिन, अंगकृष्ण रघुवंशी, श्रेयस अय्यर (कप्तान), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment