चेन्नईने मुंबईला आवळलं…! रोहित शर्माचे शतक व्यर्थ; पथिरानाचा भेदक चौकार!

WhatsApp Group

IPL 2024 MI vs CSK : वानखेडेवर रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला 20 धावांनी मात दिली. महेंद्रसिंह धोनीने 4 चेंडूत केलेल्या 20 धावा सामन्यात निर्णायक ठरल्या. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 षटकात 4 गडी गमावून 206 धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने 33 चेंडूत अर्धशतक केले. तर शिवम दुबेने 28 चेंडूत अर्धशतक ठोकले. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याला 3 षटकार ठोकले.

प्रत्युत्तरात मुंबईकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली, तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. रोहितने 11 चौकार आणि 5 षटकारांसह 105 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त तिलक वर्माने 31 धावांची खेळी केली. चेन्नईकडून मथिशा पथिरानाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मुंबईला 20 षटकात 6 बाद 186 धावांपर्यंत पोहोचता आले.

हेही वाचा – 6,6,6….धोनीचे मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत! पांड्याला ठोकले सलग 3 षटकार! पाहा Video

तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाडने 5 चौकार आणि 5 षटकारांसह 69 धावा केल्या. रचिन 21 धावांवर श्रेयस गोपालचा बळी ठरला. त्यानंतर शिवम दुबेने फटकेबाजी केली. दुबेने 10 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 66 धावा केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल.

चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कप्तान), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment