IPL 2024 LSG vs MI Mayank Yadav : लखनऊ सुपर जायंट्स मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी लोकांच्या नजरा मयंक यादववर असणार आहेत, ज्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. लखनऊमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी सांगितले होते की तो तयार आहे. मयंक सतत मैदानाबाहेर असून पुनरागमनासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याच्याबाबत आणखी एक मोठे अपडेट समोर आले आहे.
“मयंक तंदुरुस्त आहे. त्याने त्याच्या सर्व फिटनेस चाचण्या पास केल्या आहेत. तो खूप उत्सुक आहे. आशा आहे की तो उद्याच्या संभाव्य 12 खेळाडूंचा भाग असेल,” असे संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा – IPL 2024 Points Table : राजस्थान रॉयल्ससोबत ‘या’ संघांचं प्लेऑफमध्ये खेळणं निश्चित!
एमआय विरुद्धच्या सामन्यापूर्वी मयंक नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला होता. सुरुवातीला तो पूर्णपणे आरामदायी दिसत नव्हता, पण हळूहळू त्याला लय मिळत असल्याचे दिसून आले. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल त्याच्यावर सतत लक्ष ठेवून होते आणि त्याला ठराविक ठिकाणी चेंडू टाकण्याच्या सूचना देत होते. यावेळी संघाचा कर्णधार केएल राहुलही तिथे उपस्थित होता. यानंतर मयंकने जवळून झेल घेण्याचा सराव केला आणि त्याने काही डायव्हिंग झेलही घेतले.
मयंकने पंजाब किंग्जविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात तीन विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार जिंकला. यानंतर, पुढच्याच सामन्यात मयंकने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या आणि पुन्हा एकदा सामनावीर ठरला. मात्र, लखनऊमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान एक षटक टाकल्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. नंतर असे दिसून आले की त्याला साइड स्ट्रेन आहे आणि तेव्हापासून तो एकही सामना खेळलेला नाही.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा