IPL 2024 : केएल राहुल, ऋतुराज गायकवाड यांना 12-12 लाखांचा दंड!

WhatsApp Group

IPL 2024 LSG vs CSK : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा लखनऊ सुपर जायंट्सने 8 विकेट्सने पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना जिंकल्यानंतरही त्याच्या चुकीबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला. मात्र, या सामन्यात चेन्नईचा संघही संथ गोलंदाजीसाठी दोषी आढळला. कॅप्टन ऋतुराज गायकवाडलाही दंड ठोठावण्यात आला आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 34व्या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार यांना आयपीएल सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी प्रत्येकी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आपल्याच मैदानावर खेळणाऱ्या लखनऊने शुक्रवारी चेन्नईचा आठ विकेट्स राखून पराभव केला. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटसाठी या संघांचा हा पहिलाच गुन्हा होता, त्यामुळे राहुल आणि ऋतुराज यांना दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा – IPL 2024 LSG Vs CSK : रवींद्र जडेजाचा अफलातून कॅच..! बिबट्यासारखी झडप घालून चेंडू पकडला; पाहा Video

“लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला टाटा इंडियन प्रीमियर लीग 2024 दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध स्लो ओव्हररेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे,” आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यालाही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाने 6 विकेट गमावून 176 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 57 तर अजिंक्य रहाणेने 36 धावांची खेळी केली. अखेरीस महेंद्रसिंह धोनीने 9 चेंडूत 28 धावा करत संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ संघाने कर्णधार केएलच्या 82 धावा आणि क्विंटन डी कॉकच्या 54 धावांच्या जोरावर 19 षटकात 2 गडी गमावून विजय मिळवला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment