IPL 2024 LSG vs CSK : रवींद्र जडेजाचा अफलातून कॅच..! बिबट्यासारखी झडप घालून चेंडू पकडला; पाहा Video

WhatsApp Group

IPL 2024 LSG vs CSK Ravindra Jadeja Catch : चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कॅच घेतला. लखनऊचा कप्तान केएल राहुलने पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू जडेजाने एका हाताने सूर मारत टिपला. जडेजाचा हा कॅच एकदा चेक करण्यात आला, पण पंचांनी हा कॅच निर्दोष ठरवला. मथिशा पथिरानाच्या शेवटच्या षटकात आलेल्या या कॅचचा चेन्नईला काही फायदा झाला नाही, कारण या सामन्यात राहुलने 82 धावांचे विजयी योगदान दिले. असे असले तरी जडेजाच्या या कॅचची सर्वत्र वाहवा होत आहे.

हेही वाचा – IPL 2024 LSG Vs CSK : लखनऊची चेन्नईवर सहज मात! केएल राहुल-क्विटन डी कॉकची जबरदस्त पार्टनरशिप

कप्तान केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या जबरदस्त पार्टनरशिपच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जला 8 गड्यांनी सहज मात दिली. लखनऊमध्ये रंगलेल्या या सामन्यात लखनऊने टॉस जिंकून प्रथम चेन्नईला फलंदाजीचे निमंत्रण दिले. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. चेन्नईचे आघाडीचे सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले. मधल्या फळीत रवींद्र जडेजाने नाबाद 57 धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरात लखनऊकडून केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी 134 धावांची सलामी दिली. डी कॉकने 5 चौकार आणि एका षटकारासह 54 धावांची खेळी केली. राहुलने 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले. 19व्या षटकात मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. पूरनने नाबाद 23 धावांची खेळी केली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment