IPL 2024 LSG vs CSK MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने फक्त 9 चेंडूत नाबाद 28 धावा तडकावल्या. चाहत्यांना शेवटच्या षटकात धोनीची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. लखनऊमध्ये सुरू असलेल्या सामन्यात चेन्नईने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या.चेन्नईचे आघाडीचे सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले. मधल्या फळीत रवींद्र जडेजाने नाबाद 57 धावांची खेळी केली.
लखनऊच्या गोलंदाजांनी घरच्या मैदानाचा फायदा घेत चेन्नईच्या स्टार खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखवला. रचिन रवींद्र पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला. ऋतुराज गायकवाड 17 धावा काढून बाद झाला. शिवम दुबेला फक्त 3 धावांवर मार्कस स्टॉइनिसने झेलबाद केले. मोईन अलीने जडेजाला साथ दिली. अलीने 3 षटकारांसह 30 धावा केल्या. धोनीने 2 षटकार आणि 3 चौकारांसह चाहत्यांचे पुन्हा मनोरंजन केले. यातील एक षटकार 101 मीटर लांबीचा होता. लखनऊकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक 2 विकेट्स काढल्या.
हेही वाचा – मधुमेह असलेल्या व्यक्तीने आंबा खाल्ल्यास शरीराचे काय होते? जाणून घ्या!
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कप्तान आणि विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर.
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिषा पथिराना.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा