IPL 2024 LSG vs CSK : लखनऊची चेन्नईवर सहज मात! केएल राहुल-क्विटन डी कॉकची जबरदस्त पार्टनरशिप

WhatsApp Group

IPL 2024 LSG vs CSK : कप्तान केएल राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या जबरदस्त पार्टनरशिपच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जला 8 गड्यांनी सहज मात दिली. लखनऊमध्ये रंगलेल्या या सामन्यात लखनऊने टॉस जिंकून प्रथम चेन्नईला फलंदाजीचे निमंत्रण दिले. संथ खेळपट्टी आणि घरच्या मैदानावर खेळण्याच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा लखनऊने उचलला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. चेन्नईचे आघाडीचे सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले. मधल्या फळीत रवींद्र जडेजाने नाबाद 57 धावांची खेळी केली.

लखनऊच्या गोलंदाजांनी घरच्या मैदानाचा फायदा घेत चेन्नईच्या स्टार खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखवला. रचिन रवींद्र पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला. ऋतुराज गायकवाड 17 धावा काढून बाद झाला. शिवम दुबेला फक्त 3 धावांवर मार्कस स्टॉइनिसने झेलबाद केले. मोईन अलीने जडेजाला साथ दिली. अलीने 3 षटकारांसह 30 धावा केल्या. धोनीने 2 षटकार आणि 3 चौकारांसह चाहत्यांचे पुन्हा मनोरंजन केले. यातील एक षटकार 101 मीटर लांबीचा होता. लखनऊकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक 2 विकेट्स काढल्या.

प्रत्युत्तरात लखनऊकडून केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी 134 धावांची सलामी दिली. डी कॉकने 5 चौकार आणि एका षटकारासह 54 धावांची खेळी केली. राहुलने 9 चौकार आणि 3 षटकारांसह 82 धावांची जबरदस्त इनिंग खेळली. मथिशा पथिरानाच्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने राहुलचा जबरदस्त झेल टिपला. पॉइंटला त्याचा हा एक हाती झेल पाहून सर्व थक्क झाले. 19व्या षटकात मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. पूरनने नाबाद 23 धावांची खेळी केली.

हेही वाचा – IPL 2024 LSG Vs CSK : चेन्नईचे लखनऊला 177 धावांचे टार्गेट! धोनीचा 101 मीटर लांब षटकार, पाहा!

दोन्ही संघांची Playing 11

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कप्तान आणि विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर.

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिषा पथिराना.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment