IPL 2024 Playoffs : आयपीएल 2024 चे सर्व लीग सामने संपले आहेत. प्ले ऑफची शर्यतही संपली असून चार संघांची नावे जाहीर झाली आहेत. रविवारी, 19 मे रोजी सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा पराभव केला तर कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. कोलकाता, हैदराबाद, राजस्थान आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
70 लीग सामन्यांनंतर आता प्लेऑफसाठी चार संघ मिळाले आहेत. कोलकाता आणि हैदराबाद गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थान तिसऱ्या तर बंगळुरू चौथ्या स्थानावर आहे. प्लेऑफ सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, क्वालिफायर पहिल्या आणि दुसऱ्या संघांमध्ये खेळला जाईल. विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघामधील सामन्यातील विजेत्याशी खेळून अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा – Maharashtra Board 12th Result 2024 : बारावीच्या निकालाची तारीख जाहीर! जाणून घ्या कसा पाहता येईल निकाल
प्लेऑफमध्ये तीन सामने खेळवले जाणार आहेत, त्यानंतर स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. एक क्वालिफायर आणि दोन एलिमिनेटर सामने असतील. 21 रोजी हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात क्वालिफायर खेळला जाईल. राजस्थान आणि बंगळुरू पहिल्या एलिमिनेटरमध्ये खेळतील. येथे विजेता संघ कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात पराभूत संघाशी खेळेल.
पावसाने प्लेऑफ वाहून गेल्यास काय होईल?
आता प्रश्न पावसाचा आहे, त्यामुळे सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास किमान 5-5 षटकांचा सामना आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे शक्य न झाल्यास सुपर ओव्हर सामन्याचा निकाल लावण्याचे प्रयत्न केले जातील. पावसामुळे संपूर्ण सामना वाहून गेला, तर रद्द झाल्यास पॉइंट टेबलवरील क्रमवारीच्या आधारे निर्णय घेतला जाईल. ज्या संघाची स्थिती चांगली असेल तो संघ पुढे जाईल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा