IPL 2024 KKR vs SRH : दोन महागड्या खेळाडूंमध्ये थरार..! हैदराबादने जिंकला टॉस, पाहा Playing 11

WhatsApp Group

IPL 2024 KKR vs SRH | आयपीएल 2024 मध्ये डबल हेडरचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. केकेआरची कमान पुन्हा एकदा श्रेयस अय्यरच्या हाती असेल. पाठीच्या दुखापतीमुळे तो आयपीएल 2023 मध्ये खेळू शकला नाही. त्याच्या जागी नितीश राणाला कर्णधारपद देण्यात आले आणि संघ सातव्या स्थानावर राहिला.

अय्यरच्या पुनरागमनाकडून केकेआरला खूप अपेक्षा असतील. तसेच, सर्वांच्या नजरा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर असतील, ज्याला केकेआरने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा विकणारा खेळाडू आहे. त्याच वेळी, वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे हैदराबादची सूत्रे आहेत, जो इंडियन लीगमधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला हैदराबादने 20.5 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. फ्रेंचायझीने एडन मार्करामला हटवून कमिन्सकडे कर्णधारपद सोपवले. तो प्रथमच आयपीएलमध्ये नेतृत्व करताना दिसणार आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांचा कर्णधार आहे.

हेही वाचा – VIDEO : तब्बल 454 दिवसांनंतर ऋषभ पंतचे मैदानात कमबॅक…! पाहा इमोशनल मुमेंट

हैदराबादचा संघ गेल्या हंगामात दहाव्या स्थानावर होता. हेड-टू-हेड बद्दल बोलायचे झाले तर, हैदराबाद विरुद्ध केकेआरचा वरचष्मा आहे. दोघांमध्ये एकूण 25 सामने झाले आहेत. कोलकाताने 16 वेळा तर हैदराबादने 9 वेळा विजयी झेंडा फडकावला आहे.

दोन्ही संघांची Playing 11

सनरायझर्स हैदराबाद – मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन.

कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरिन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment