

IPL 2024 KKR vs SRH Qualifier 1 : आयपीएल 2024 चा पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगत आहे. या सामन्यात हैदराबादता कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी मिळणार असल्या, तरी केकेआर आणि हैदराबाद हा सामना जिंकून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. केकेआरचा कप्तान श्रेयस अय्यरला टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी हवी होती, त्यामुळे टॉसचा निर्णय दोन्ही संघांच्या बाजूने झाला असे म्हणता येईल.
कागदावर केकेआर आणि सनरायझर्स हे तुल्यबळ संघ वाटतात, त्यामुळे हा सामना अधिक रोमांचक झाला आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करून अनेक विक्रम केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या हेडने आक्रमक फलंदाजीची नवी व्याख्या तयार केली असून त्याने आतापर्यंत एक शतक आणि चार अर्धशतकांसह 533 धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत अभिषेकनेही (467 धावा) मुक्तपणे खेळून आयपीएलमध्ये आतापर्यंत 41 षटकार मारले आहेत.
🚨 Toss Update 🚨
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
Sunrisers Hyderabad elect to bat against Kolkata Knight Riders.
Follow the Match ▶️ https://t.co/U9jiBAl187#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/LXVNHfhhp3
हेही वाचा – Driving Licence New Rules 2024 : 1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्स नियमांत मोठा बदल!
सुनील नरिन केकेआरसाठी बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत प्रभावी कामगिरी करत आहे. नरिन या मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, त्याने 461 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर नरेनची चेंडूसह कामगिरीही दमदार राहिली आहे. तथापि, फिल सॉल्टची अनुपलब्धता केकेआरसाठी एक धक्का आहे कारण या हंगामात नरिन आणि सॉल्टची जोडी खूप यशस्वी झाली होती. हे दोन्ही फलंदाज संघाला दमदार सुरुवात करून देत होते आणि महत्त्वाच्या सामन्यापूर्वी सॉल्ट माघारी परतला.
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन
कोलकाता नाइट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा