VIDEO : ‘बिग मॅच प्लेअर’ मिचेल स्टार्कने सनरायझर्स हैदराबादची उडवली दाणादाण!

WhatsApp Group

IPL 2024 KKR vs SRH Qualifier 1 Mitchell Starc : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कने आपल्या झंझावाताने थक्क केले आहे. लीगच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात स्टार्कने सनरायझर्स हैदराबादची दाणादाण उडवली. हैदराबादचा विस्फोटक खेळाडू ट्रॅव्हिस हेडचा स्टार्कने शून्यावर त्रिफळा उडवला. त्यानंतर तीन षटकात स्टार्कने नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमद यांनाही तंबूचा मार्ग दाखवला. पॉवरप्लेमध्ये हैदराबादची अवस्था 39-4 अशी झाली.

या सामन्यात हैदराबादचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण तो साफ चुकीचा ठरला. ट्रॅव्हिस हेड-अभिषेक शर्माच्या भरवशावर संघाला मोठी धावसंख्या मिळेल, असा कमिन्सचा मानस होता. पण मिचेल स्टार्कने त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. बिग मॅच प्लेअर म्हणून खासियत असलेल्या स्टार्कला कोलकाताने यंदा 24.75 कोटींची बोली लावत आपल्या संघात दाखल केले. संपूर्ण स्पर्धेत महागडी षटके टाकणारा गोलंदाज म्हणून तो ट्रोल झाला, पण त्याने आपले वेगळेपण दाखवले, ज्याचा फायदा कोलकाता संघाला होत आहे.

दोन्ही संघांची Playing 11

सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन

कोलकाता नाइट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment