KKR vs SRH Qualifier 1 : कोलकाता नाइट रायडर्स फायनलमध्ये, सनरायझर्स हैदराबादचा उडवला धुव्वा!

WhatsApp Group

IPL 2024 KKR vs SRH Qualifier 1 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने क्वालिफायर-1च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून फायनलमध्ये धडक दिली आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात केकेआरने हैदराबादचा 8 गड्यांनी पराभव केला. अहमदाबादमध्ये रंगलेल्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या हैदराबादला कोलकाताने 159 धावांवर ऑलआऊट केले. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पॉवरप्लेमध्ये हैदराबादची भंबेरी उडवली आणि त्यांना मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखले. प्रत्युत्तरात कोलकाताकडून व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी अंदाजात अर्धशतकी फटकेबाजी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवले. आता 26 मे रोजी केकेआर फायनलसाठी सज्ज होणार आहे.

मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती यांची भेदक गोलंदाजी आणि त्यांना इतर गोलंदाजांनी दिलेली साथ सनरायझर्स हैदराबादला मारक ठरली. नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगसाठी उतरलेल्या हैदराबादला केकेआरसमोर 159 धावाच करता आल्या. मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असलेला ट्रॅव्हिस हेड (0), अष्टपैलू खेळा़डू नितीश रेड्डी (9) आणि शाहबाज अहमद (0) यांना स्टार्कने तंबूचा मार्ग दाखवला. अभिषेक शर्मा वैभव अरोराचा बळी ठरला, त्याला तीनच धावा करता आल्या. संघाचा डाव सांभाळत राहुल त्रिपाठीने 7 चौकार आणि एका षटकारासह 55 धावांची खेळी केली. पण अब्दुल समदच्या चुकीमुळे तो धावबाद झाला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या हेनरिक क्लासेनला वरुण चक्रवर्तीने बाद केले. क्लासेनने 32 धावांची खेळी केली. कप्तान पॅट कमिन्सने शेपटाकडे चांगली फलंदाजी करत 2 चौकार आणि 2 षटसारांसह 30 धावांचे योगदान दिले. हैदराबादचा डाव 19.3 षटकात 159 धावांवर संपुष्टात आला. मिचेल स्टार्कने 34 धावांत 3 विकेट्स घेतल्या, तर वरुण चक्रवर्तीने 2 विकेट्स काढल्या. वैभव अरोरा, सुनील नरिन, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दोघे अय्यर चमकले!

हैदराबादच्या सोप्या धावसंख्येचा पाठलाग करताना सुनील नरिन आणि रहमनुल्लाह गुरबाज यांनी 44 धावांची आक्रमक सलामी दिली. नरिनने 21 तर गुरबाजने 23 धावा केल्या. टी. नटराजनने गुरबाजला बाद करत ही जोडी फोडली. तर नरिनला पॅट कमिन्सने बाद केले. मात्र या दोघांनंतर व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांनी फटकेबाजी केली. दोघांनी आक्रमक खेळत करत 13.4 षटकातच संघाला विजय मिळवून दिला. व्यंकटेशने 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 51 आणि श्रेयसने चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 58 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment