IPL 2024 : कोलकाताचे राजस्थानला 224 धावांचे आव्हान; सुनील नरिनचे वादळी शतक!

WhatsApp Group

IPL 2024 KKR vs RR Sunil Narine : कोलकाता नाइट रायडर्सचा तडाखेबंद सलामीवीर सुनील नरिनने टी-20 आणि आयपीएल करियरमधील पहिले शतक ठोकले. इडन गार्डन्सवर रंगलेल्या सामन्यात नरिनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ही कामगिरी केली. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नरिनच्या शानदार शतकाच्या जोरावर कोलकाताने राजस्थानला 224 धावांचे आव्हान दिले आहे.

केकेआरचा सलामीवीर फिल सॉल्ट (10) स्वस्तात आऊट झाल्यानंतर अंगक्रिश रघुवंशी आणि सुनील नरिन यांनी संघाला जलद गतीने शतकापार पोहोचवले. रघुवंशीने 30 धावांचे योगदान दिले. कप्तान श्रेयस अय्यरला (11) युझवेंद्र चहलने तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर नरिनने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 13 चौकार आणि 6 षटकारांसह 109 धावा ठोकल्या. 18व्या षटकात नरिनला ट्रेंट बोल्टने बोल्ड केले.

हेही वाचा – IPL 2024 : रियान परागने सोडला क्रिकेटमधला सर्वात सोपा कॅच! लगेच तोंड लपवलं; वाचा..

त्यानंतर रिंकू सिंहने शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. त्याने 2 षटकारांसह नाबाद 20 धावा केल्या. कोलकाताने 20 षटकात 6 बाद 223 धावा केल्या. राजस्थानकडून आवेश खान आणि कुलदीप सेन यांनी 2-2 विकेट काढल्या.

दोन्ही संघांची Playing 11

कोलकाता नाइट रायडर्स – फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरिन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment