IPL 2024 : रियान परागने सोडला क्रिकेटमधला सर्वात सोपा कॅच! लगेच तोंड लपवलं; वाचा..

WhatsApp Group

IPL 2024 KKR vs RR : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 31 वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. राजस्थानने 6 पैकी 5 सामने जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे, तर कोलकाताने 5 पैकी 4 सामने जिंकून दुसरे स्थान निश्चित केले आहे. जर कोलकाताने आजचा सामना जिंकला तर ते पहिल्या स्थानावर पोहोचतील.

पहिल्याच षटकात रियान परागने फिल सॉल्टचा जीवदान दिले. ट्रेंट बोल्टने टाकलेल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सॉल्टने बॅकवर्ड पॉइंटला फटका खेळला. तिथे परागला आरामात झेल पकडता आला असता, पण एकदम आरामात घेण्याच्या प्रयत्नात तो त्याच्याकडून सुटला. या सामन्यात फिल सॉल्टने 10 धावा केल्या. आवेश खानने त्याला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद केले.

हेही वाचा – Mutual Fund NFO : फक्त ₹1000 पासून सुरू करा गुंतवणूक! जाणून घे भाऊ…

दोन्ही संघांची Playing 11

कोलकाता नाइट रायडर्स – फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरिन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment