IPL 2024 KKR vs RR : राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. इडन गार्डन्सवर रंगलेल्या रंगतदार सामन्यात राजस्थानने कोलकाता नाइट रायडर्सचा 2 गड्यांनी पराभव केला. राजस्थानने 224 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. आयपीएलच्या इतिहासात इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग प्रथमच झाला आहे. जोस बटलर राजस्थानसाठी हिरो ठरला, त्याने यंदाच्या हंगामातील दुसरे शतक ठोकले. गुणतालिकेत राजस्थान आता 10 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
कोलकाताने 20 षटकात 6 बाद 223 धावा केल्या. त्यांचा तडाखेबंद सलामीवीर सुनील नरिनने टी-20 आणि आयपीएल करियरमधील पहिले शतक ठोकले. केकेआरचा सलामीवीर फिल सॉल्ट (10) स्वस्तात आऊट झाल्यानंतर अंगक्रिश रघुवंशी आणि सुनील नरिन यांनी संघाला जलद गतीने शतकापार पोहोचवले. रघुवंशीने 30 धावांचे योगदान दिले. कप्तान श्रेयस अय्यरला (11) युझवेंद्र चहलने तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर नरिनने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 13 चौकार आणि 6 षटकारांसह 109 धावा ठोकल्या. 18व्या षटकात नरिनला ट्रेंट बोल्टने बोल्ड केले. त्यानंतर रिंकू सिंहने शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. त्याने 2 षटकारांसह नाबाद 20 धावा केल्या. राजस्थानकडून आवेश खान आणि कुलदीप सेन यांनी 2-2 विकेट काढल्या.
हेही वाचा – हार्दिक पांड्याचे नशीब आता रोहित शर्माच्या हाती, एक चूक आणि वर्ल्डकपमधून बाहेर!
कोलकाताच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने यशस्वी जयस्वाल (19), संजू सॅमसन (12) अपयशी ठरले. रियान परागने 34 धावांची खेळी केली. जोस बटलरने एका बाजूने किल्ला लढवला. त्याला रोव्हमन पॉवेलची साथ लाभली. त्याने 26 धावा केल्या. बटलरने 60 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 107 धावांची खेळी केली. कोलकाताकडून नरिन, चक्रवर्ती, हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा