IPL 2024 KKR vs MI : आयपीएलच्या 60व्या सामन्याला पावसाचा फटका बसला. पावसामुळे सामना सुमारे 2 तास उशिराने सुरू झाला. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन षटकांत दोन गडी गमावून कोलकाताची सुरुवात खराब झाली. नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला बाद केले. यानंतर जसप्रीत बुमराह आला आणि त्याने धोकादायक फलंदाज सुनील नरिनला क्लीन बोल्ड केले.
बुमराहने यॉर्कर चेंडू टाकला, जो सुनीलने सोडण्याचा प्रयत्न केला आणि बॅट हवेत ठेवली, हा वेगवान ऑफ स्टंपला लागला. हा चेंडू पाहून नरिनही थक्क झाला. बुमराहचा इनस्विंग बॉल त्याच्या स्टंपला लागून त्याला केव्हा बोल्ड केले हे नरिनला कळलेच नाही.
हेही वाचा – Rain Alert : देशात मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण, येत्या 7 दिवसांत अनेक राज्यांमध्ये बरसणार!
या सामन्यात कोलकाताने निर्धारित 16 षटकात 7 बाद 157 धावा केल्या. कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने 21 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 42 धावा केल्या. नितीश राणाने 33, आंद्रे रसेलने 24, रिंकू सिंहने 20 धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघांची Playing 11
कोलकाता नाइट रायडर्स – फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरिन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, हर्षित राणा, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती.
मुंबई इंडियन्स – नमन धीर, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, पीयुष चावला, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा