

IPL 2024 Jonty Rhodes Praises Ball Boy : कोलकाता नाइट रायडर्सने IPL 2024 च्या महत्त्वाच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा 98 धावांनी पराभव केला. यासह केकेआरने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. या पराभवानंतर एलएसजीची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. सुनील नरिनने पुन्हा एकदा शानदार खेळी केली. या सामन्यादरम्यानचा एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सामन्यादरम्यान लखनऊचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने षटकार खेचला. हा चेंडू सीमाबाहेर उभ्या असलेल्या बॉल बॉयने पकडला. बॉल बॉयच्या अप्रतिम कॅचनंतर लखनऊच्या जॉन्टी रोड्सनेही टाळ्या वाजवल्या. सामन्यानंतर जॉन्टीने या बॉल बॉयची मुलाखत घेतली. या बॉल बॉयचे नाव अथर्व गुप्ता आहे. जॉन्टीने दखल घेतल्याचे पाहून अथर्वलाही आनंद झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. जणू त्याचा विश्वासच बसत नव्हता की त्याने एवढा अप्रतिम झेल कसा घेतला. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत आणि जॉन्टी रोड्सच्या वागण्याचंही कौतुक होत आहे.
हेही वाचा – T20 World Cup 2024 दरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका, पाकिस्तानमधून धमकी!
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाताने सुनील नरिनच्या झंझावाती खेळीमुळे 20 षटकांत 6 गडी गमावून 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ 16.1 षटकांत 137 धावांत आटोपला. या विजयासह केकेआरने 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असून प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा