IPL 2024 : शुबमन गिल, साई सुदर्शनची शतके! चेन्नईला फोडलं; ठोकली रेकॉर्ड पार्टनरशिप!

WhatsApp Group

IPL 2024 GT vs CSK : आयपीएल 2024च्या 59 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल वेगळ्या स्टाईलमध्ये फलंदाजी करताना दिसला. गिलची फलंदाजीची ही शैली या मोसमात आजवर पाहायला मिळाली नव्हती, पण अहमदाबादमध्ये गिलने शानदार फलंदाजी करत कर्णधारपदाची खेळी केली आणि शतक झळकावले. गिलचे आयपीएलच्या या मोसमातील हे पहिले शतक होते आणि त्याच्या आयपीएल क्रिकेट कारकिर्दीतील चौथे शतक होते. या सामन्यात गिलने त्याचा सलामीचा जोडीदार साई सुदर्शनसह आयपीएलमध्ये गुजरातसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रमही केला. टॉस गमावलेल्या गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 231 धावा केल्या. चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक 2 विकेट्स काढल्या.

CSK विरुद्धच्या या सामन्यात गिलने पहिल्या 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 50 चेंडूत आपले शतकही पूर्ण केले. या सामन्यात गिलने 55 चेंडूत 6 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 104 धावांची खेळी केली आणि नंतर तो बाद झाला. या सामन्यात त्याने 189.09 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. या सामन्यात गिलने साईसह पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी करत इतिहास रचला. आयपीएलमधील या संघाकडून ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली.

हेही वाचा – Gold Silver Rate On Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोने चमकले, चांदीचा विक्रम, जाणून घ्या रेट!

साई सुदर्शनचे शतक

या सामन्यात साई सुदर्शनने प्रथम 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर 50 चेंडूत पहिले शतकही पूर्ण केले. त्याने चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने 51 चेंडूत 7 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी केली आणि नंतर तो बाद झाला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment