IPL 2024 : गिल-सुदर्शनकडून CSKचा मोठा पराभव, प्लेऑफच्या अडचणी वाढल्या!

WhatsApp Group

IPL 2024 GT vs CSK : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा 59 वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरातने चेन्नईचा 35 धावांनी पराभव केला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो चुकीचा ठरला. गुजरात टायटन्ससाठी सलामीला आलेल्या साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी शानदार फलंदाजी केली. त्याने सीएसकेला विजयासाठी 232 धावांचे लक्ष्य दिले. ज्याचा पाठलाग करण्यात चेन्नईला यश आले नाही. आता चेन्नईसाठी अडचणी वाढल्या आहेत.

साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी शानदार शतके झळकावली. साई सुदर्शनने गुजरात टायटन्ससाठी धोकादायक फलंदाजी करत 51 चेंडूत 103 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 7 षटकार मारले. तर गिलने 55 चेंडूत 104 धावांची खेळी केली. तुषार देशपांडेच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना गिल रवींद्र जडेजाच्या हाती झेलबाद झाला. गिलचे आयपीएलमधील हे चौथे शतक होते.

हेही वाचा – आता पैसे काढण्यासाठी ‘ATM’मध्ये जाण्याची गरज नाही, आधारने होईल काम!

प्रत्युत्तरात चेन्नईची सुरुवात खराब झाली. रचिन रवींद्र (1), अजिंक्य रहाणे (1) आणि कप्तान ऋतुराज गायकवाड (0) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर डॅरिल मिचेलने 63 आणि मोईन अलीने 56 धावांची खेळी केली. पण दोघे बाद झाल्यावर चेन्नईच्या आशा मावळल्या. शिवम दुबे 21 धावा केल्या. तर धोनीने 11 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 26 धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. राशिद खानला 2 विकेट्स मिळाल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment