IPL 2024 Final KKR vs SRH : आयपीएल 2024 फायनलध्ये कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या तुफान गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवला आहे. टॉस गमावलेल्या कोलकाताने प्रथम गोलंदाजी करताना हैदराबादला 18.3 षटकात फक्त 113 धावांवर ऑलआऊट केले. महत्त्वाच्या सामन्यात हैदराबादच्या स्टार फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावता आले नाही. कोलकाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 2, त्यानंतर वैभव अरोराने 1, हर्षित राणाने 2, वरुण चक्रवर्तीने 1, सुनील नरिनने 1 आणि आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 विकेट्स काढत हैदराबादला रडवले.
सनरायझर्स हैदराबादने टेकले गुडघे!
सनरायझर्स हैदराबादकडून कप्तान पॅट कमिन्सने सर्वाधि 24 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्याव्यतिरिक्त एडन मार्करामने 20 आणि हेनरिच क्लासेनने 16 धावा केल्या. सलामीवीर पुन्हा फ्लॉप ठरले. अभिषेक शर्माला 2 तर ट्रॅव्हिस हेडला भोपळाही फोडता आला नाही.
Time for the ultimate 𝗰𝗵𝗮𝘀𝗲! 👊 pic.twitter.com/3qYRtIiLgu
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 26, 2024
हेही वाचा – IPL 2024 Final : मिचेल स्टार्क पुन्हा चमकला, पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्माची दांडी गुल! पाहा Video
दोन्ही संघांची Playing 11
कोलकाता नाइट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा