

IPL 2024 Final KKR vs SRH Mitchell Starc Bowled Abhishek Sharma : बड्या मॅचचा खेळाडू मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवत फायनलमध्ये धमाका केला आहे. आयपीएल फायनलमध्ये स्टार्कने सनरायझर्स हैदराबादचा धाकड सलामीवीर अभिषेक शर्माला क्लीन बोल्ड केले. क्वालिफायर-1 च्या सामन्यात स्टार्कने हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडला बोल्ड केले होते. त्यामुळे यावेळी अभिषेकने स्ट्राइक घेतली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. स्टार्कने पहिल्या षटकातील चार चेंडू अभिषेकला स्टम्प्सच्या बाहेर खेळवले, जे निर्धाव गेले. पाचवा चेंडू स्टार्कने स्टम्प्स लाइनमध्ये खेळवला जो अभिषेकला समजला नाही आणि त्याला तंबूत परतावे लागले.
या सामन्यात अभिषेकला फक्त 2 धावा करता आल्या. तर सनरायझर्सचा दुसरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही खोलता आले नाही. केकेआरचा वेगवान गोलंदाज वैभव अरोराने हेडला यष्टीपाठी गुरबाजकरवी झेलबाद केले. हैदराबादचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्याने त्यांची अवस्था 6 बाद 2 अशी झाली. फायनलमध्ये हैदराबादचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
MITCHELL STARC – BORN FOR BIG MOMENTS.
— Johns. (@CricCrazyJohns) May 26, 2024
– The Greatest of Modern Era. 🥶 pic.twitter.com/GaLlUVfuDM
हेही वाचा – KKR Vs SRH Final : आज फायनल आणि ‘या’ दोन खेळाडूंचा बर्थडे, एकाला मिळणार ट्रॉफी, तर दुसऱ्याला पराभव!
दोन्ही संघांची Playing 11
कोलकाता नाइट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा