IPL 2024 Final KKR vs SRH : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल 2024 फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादला हरवून विजेतेपद पटकावले आहे. चेन्नईत रंगलेल्या या एकतर्फी सामन्यात कोलकाताने हैदराबादला 8 विकेट्सने सहज हरवले. या सामन्यात टॉस गमावलेल्या कोलकाताने प्रथम गोलंदाजी करताना हैदराबादला 18.3 षटकात फक्त 113 धावांवर ऑलआऊट केले. प्रत्युत्तरात सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि व्यंकटेश अय्यरच्या आक्रमक फलंदाजीमुळे कोलकाताने हा सामना 10.3 षटकात जिंकला आणि विजेतेपदाच्या ट्रॉफीवर मोहोर उमटवली. याआधी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली 2012 आणि 2014 मध्ये कोलकाताने विजेतेपद पटकावले होते. यंदा गंभीर केकेआर संघाचा मेंटॉर होता. केकेआरचे हे आयपीएलचे तिसरे विजेतेपद आहे.
केकेआरकडून गुरबाजने 39, तर व्यंकटेश अय्यरने नाबाद 52 धावा केल्या. हैदराबादला फक्त सुनील नरिन (6) आणि गुरबाजची विकेट काढण्यात यश आले. तत्पूर्वी हैदराबादचा संघ 18.3 षटकात 113 धावांवर ऑलआऊट झाला. हैदराबादकडून कप्तान पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्याव्यतिरिक्त एडन मार्करामने 20 आणि हेनरिच क्लासेनने 16 धावा केल्या. सलामीवीर पुन्हा फ्लॉप ठरले. अभिषेक शर्माला 2 तर ट्रॅव्हिस हेडला भोपळाही फोडता आला नाही. कोलकाताकडून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने 2, हर्षित राणाने 2, वैभव अरोराने 1, वरुण चक्रवर्तीने 1, सुनील नरिनने 1 आणि आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 विकेट्स काढत हैदराबादचा सुपडा साफ केला. आयपीएलल फायनलमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम नोंदवण्याची वेळही हैदराबादवर आली.
𝗖𝗛𝗔𝗠𝗣𝗜𝗢𝗡𝗦 𝗢𝗙 #𝗧𝗔𝗧𝗔𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 😍🏆
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
The 𝗞𝗢𝗟𝗞𝗔𝗧𝗔 𝗞𝗡𝗜𝗚𝗛𝗧 𝗥𝗜𝗗𝗘𝗥𝗦! 💜#KKRvSRH | #Final | #TheFinalCall | @KKRiders pic.twitter.com/iEfmGOrHVp
हेही वाचा – IPL 2024 Final : मिचेल स्टार्क पुन्हा चमकला, पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्माची दांडी गुल! पाहा Video
दोन्ही संघांची Playing 11
कोलकाता नाइट रायडर्स – रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा