IPL 2024 DC vs RR Sanju Samson Controversial Catch : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव करत दोन महत्त्वाच्या गुणांची कमाई केली. या सामन्यात कप्तान संजू सॅमसनने 8 चौकार आणि 6 षटकारांसह 86 धावांची खेळी केली. सॅमसनची विकेट चर्चेचा विषय ठरली. दिल्लीच्या 222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सॅमसनने सुंदर खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 6 षटकार ठोकले. राजस्थानच्या विजयासाठी सॅमसन मैदानावर राहणे गरजेचे होते, पण 16व्या षटकात मुकेश कुमारने शाई होपकरवी झेलबाद केले.
होपचा हा झेल वादग्रस्त ठरला. झेल घेताना होपचा पाय सीमारेषेजवळ होता. पंचांनी सॅमसनला बाद ठरवले. पण रिव्ह्यूमध्ये बघितल्यानंतर सॅमसननेही पंचांना याबाबत विचारणा केली. दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदालही सॅमसनच्या विकेटवर खुश झाले. स्टँड्समधून त्यांनी सॅमसनला खास सेंडऑफही दिला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजस्थानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने राजस्थानला 222 धावांचे तगडे आव्हान दिले. प्रत्युत्तरात राजस्थानकडून कप्तान संजू सॅमसनने जबरदस्त खेळी केली, पण त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ लाभली नाही. सॅमसन बाद झाल्यावर दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. राजस्थानला 20 षटकात 8 बाद 201 धावांपर्यंत जाता आले. दिल्लीचे आता 12 गुण झाले असून ते पाचव्या स्थानी पोहोचले आहेत.
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कप्तान), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नैब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा