IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, 20 धावांनी जिंकला रंजक सामना!

WhatsApp Group

IPL 2024 DC vs RR : आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सने घरच्या मैदानात खेळताना राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला आहे. राजस्थानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने राजस्थानला 222 धावांचे तगडे आव्हान दिले. प्रत्युत्तरात राजस्थानकडून कप्तान संजू सॅमसनने 8 चौकार आणि 6 षटकारांसह 86 धावांची खेळी केली, पण त्याला दुसऱ्या बाजूने कोणाचीही साथ लाभली नाही. सॅमसन बाद झाल्यावर दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. राजस्थानला 20 षटकात 8 बाद 201 धावांपर्यंत जाता आले. दिल्लीचे आता 12 गुण झाले असून ते पाचव्या स्थानी पोहोचले आहेत.

सॅमसनशिवाय रियान परागने 27, शुभम दुबेने 25 धावांची खेळी केली. दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी, अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने 20 षटकात 8 बाद 221 धावा केल्या. मॅकगर्कने 20 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 50 तर पोरेलने 7 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावांची खेळी केली. ट्रिस्टन स्टब्सने 20 चेंडूत 41 धावा करत संघाला दोनशेपार पोहोचवले. राजस्थानकडून रवी अश्विनने सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या.

हेही वाचा – मायावतींची मोठी घोषणा, पुतण्याला उत्तराधिकारी करण्याचा निर्णय मागे!

दोन्ही संघांची Playing 11

दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कप्तान), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नैब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment