

IPL 2024 DC vs MI : दिल्ली कॅपिट्लसचा घातक ओपनर जेक फ्रेझर-मॅकगर्कने मुंबई इंडियन्सविरुद्ध तडाखेबंद बॅटिंग केली आहे. मॅकगर्कने मुंबईचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही सोडले नाही. त्याने बुमराहच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा चोपल्या. यात दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. बुमराहने दुसऱ्या षटकात कमबॅक केले. या षटकात त्याने फक्त 3 धावा दिल्या. मॅकगर्कने अवघ्या 15 चेंडूत पुन्हा एकदा अर्धशतक साकारले. याच हंगामात मॅकगर्कने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
या सामन्यात मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे घर असलेल्या दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होत आहे. दोन्ही संघांमधील हा दुसऱ्या टप्प्यातील सामना आहे. याआधी, मुंबई इंडियन्सने दिल्लीवर विजय मिळवला होता. आता दिल्ली संघाला आज घरच्या मैदानावर परतफेड करायला आवडेल. मुंबई संघात जेराल्ड कोएत्झीऐवजी ल्यूक वूड खेळत आहे. तर दिल्लीत पृथ्वी शॉऐवजी कुशाग्रला संधी मिळाली आहे.
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्र, शाय होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कप्तान), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पंड्या (कप्तान), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयुष चावला, ल्यूक वूड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा