IPL 2024 DC vs LSG : आयपीएल 2024 च्या प्लेऑफमधून लखनऊ सुपर जायंट्स संघ बाहेर पडला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने लखनऊचा घरच्या मैदानावर 19 धावांनी पराभव करत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या लखनऊसमोर दिल्लीने 20 षटकात 208/4 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात लखनऊला 20 षटकात 189/9 पर्यंत जाता आले. दिल्लीच्या विजयामुळे दुसऱ्या क्रमांकावर 16 गुणांनिशी असलेला राजस्थान रॉयल्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.
नाणेफेक गमावलेल्या दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना लखनऊला 209 धावांचे आव्हान दिले. दिल्लीकडून सलामीवीर अभिषेक पोरेल (58), शाई होप (38), ऋषभ पंत (33) आणि ट्रिस्टन स्टब्स (नाबाद 57) यांनी योगदान दिले. लखनऊने खूप कॅचेस सोडल्या.
हेही वाचा – चेन्नई सुपर किंग्जचा ‘हा’ धुरंधर होणार टीम इंडियाचा नवा कोच?
प्रत्युत्तरात लखनऊची सुरुवात खराब झाली. कप्तान केएल राहुल (5) स्वस्तात बाद झाला. इशांत शर्माने लखनऊला तीन धक्के दिले. ठराविक अंतरावर विकेट पडल असल्या तरी लखनऊच्या फलंदाजांनी हाणामारी सुरुच ठेवली. त्यांच्याकडून अर्शद खानने पहिले आयपीएल अर्धशतक झळकावले. त्याने नाबाद 58 धावांची खेळी केली. दिल्लीकडून इशांतव्यतिरिक्त खलील अहमद, मुकेश कुमार, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा