IPL 2024 DC vs KKR : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात खळबळ उडवून दिली आहे. विशाखापट्टणम येथे बुधवारी (3 एप्रिल) झालेल्या सामन्यात केकेआरने दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव केला. या सामन्यात केकेआर संघाने प्रथम ऐतिहासिक धावसंख्या उभारली. यानंतर दिल्लीचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक साधली. अशा प्रकारे केकेआर गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाचा चार सामन्यांतील हा तिसरा पराभव आहे.
कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 7 गडी गमावून 272 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या यादीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे, ज्याने याच मोसमात 27 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 गडी गमावून 277 धावा केल्या होत्या.
तसेच, आयपीएलच्या इतिहासातील केकेआरची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी त्यांनी पंजाब किंग्जविरुद्ध 5 विकेट्सवर 245 धावा केल्या होत्या. हा सामना 12 मे 2018 रोजी इंदूरमध्ये झाला. केकेआरने हा सामना 31 धावांनी जिंकला.
हेही वाचा – IPL 2024 DC Vs KKR : केकेआरच्या दिल्लीसमोर विक्रमी 272 धावा, सुनीलचा तडाखा!
या सामन्यात सुनील नरिनने कोलकाताकडून 39 चेंडूत 85 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. यानंतर रघुवंशीने 27 चेंडूत 54 धावा करून सर्वांना विश्वासात घेतले. त्याचे हे पहिलेच आयपीएल अर्धशतक ठरले. शेवटी आंद्रे रसेलने 19 चेंडूत 41 धावांची तर रिंकू सिंहने 8 चेंडूत 26 धावांची तुफानी खेळी केली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा