IPL 2024 DC vs KKR : आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना खेळला जात आहे. विशाखापट्टणमच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दिल्लीला 272 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले आहे. नाणेफेक जिंकून केकेआरने 20 षटकांत 7 गडी गमावून 272 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. केकेआरकडून सुनील नरिनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 39 चेंडूंत 7 चौकार आणि षटकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. नरिनने फिलिप सॉल्ट (18) सोबत पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडून केकेआरला वेगवान सुरुवात करून दिली. त्याने आंगक्रिश रघुवंशी (27 चेंडूत 54, पाच चौकार, तीन षटकार) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी केली.
आंद्रे रसेलने 19 चेंडूत 41 धावा जोडल्या. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. रसेल आणि कर्णधार श्रेयस अय्यर (18) यांनी चौथ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. सहाव्या क्रमांकावर आलेल्या रिंकू सिंहनेही शानदार खेळी केली. त्याने 8 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले. रिंकूच्या बॅटमधून एक चौकार आणि तीन षटकार आले. रमणदीप सिंगला केवळ दोन धावा करता आल्या. व्यंकटेश अय्यर 5 धावांवर नाबाद राहिला आणि मिचेल स्टार्क 2 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीकडून एनरिक नॉर्किया सर्वात चांगला ठरला. त्याने 59 धावांत तीन बळी घेतले. इशांत शर्माने दोन, खलील अहमद आणि मिचेल मार्शने प्रत्येकी एक बळी घेतला.
हेही वाचा – “….म्हणून ते जिंकू शकले नाहीत”, अंबाती रायुडूने RCBची पारच काढली राव!
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कप्तान), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्किया, इशांत शर्मा, खलील अहमद.
कोलकाता नाइट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), रिंकू सिंह, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा