IPL 2024 : इशांत शर्माचा जीवघेणा यॉर्कर, बिल्डिंगप्रमाणे कोसळला आंद्रे रसेल, मग टाळी वाजवून कौतुक! पाहा Video

WhatsApp Group

IPL 2024 DC vs KKR : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामातील 16 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात केकेआरने दिल्लीला 106 धावांनी मात दिली. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 272 धावांचा डोंगर उभा केला. यात आंद्रे रसेलच्या 19 चेंडू 41 धावांचा समावेश होता. रसेलला इशांत शर्माने सुरेख यॉर्करवर क्लीन बोल्ड केले.

हा चेंडू इतका भारी होता, की खुद्द आंद्रे रसेलने इशांतला दाद दिली. कोलकाताने 20 षटकांत 7 गडी गमावून 272 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादनंतर केकेआर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा संघ ठरला. यापूर्वी हैदराबादने मुंबई इंडियन्ससमोर 277 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

दरम्यान, केकेआरकडून खेळायला आलेल्या बहुतांश खेळाडूंनी भरपूर धावा केल्या. दरम्यान, आंद्रे रसेल बाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रसेल जमिनीवर पडताना दिसत आहे.

हेही वाचा – IPL 2024 DC Vs KKR : ऐतिहासिक सामन्यात केकेआरचा 106 धावांनी विजय, दिल्लीला फोडलं!

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment