षटकारांची हॅट्ट्रिक, 1 षटकात 31 धावा, ऋषभ पंतने सर्वात धोकादायक गोलंदाजाला कुटले!

WhatsApp Group

IPL 2024 DC vs GT Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने इंडियन प्रीमियर लीगमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातानंतर मैदानापासून दूर राहून परतलेल्या या खेळाडूने आपल्या जुन्या वादळी शैलीत फलंदाजी केली आहे. बुधवारी गुजरात टायटन्सविरुद्ध ऋषभ पंतने शेवटच्या षटकात चार षटकार आणि एक चौकार मारून 31 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने गुजरातविरुद्ध 4 गडी गमावून 224 धावा केल्या.

ऋषभ पंतने इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये तिसरे अर्धशतक झळकावले. हे अर्धशतक अशा वेळी आले जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती. पंतने संघाला गुजरातविरुद्ध 88 धावांची नाबाद खेळी करत 224 धावांपर्यंत नेले. 12 षटकापर्यंत संघाची धावसंख्या 105 धावा होती. ऋषभ पंतच्या खेळीमुळे संघाने पुढील 8 षटकांत 119 धावा जोडल्या.

हेही वाचा – EPF Interest : जाणून घ्या तुमच्या खात्यात पीएफचे व्याज कधी येईल! ईपीएफओचा खुलासा

एका षटकात 31 धावा

ऋषभ पंतने गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात 31 धावा केल्या. गुजरात संघातील सर्वात विश्वासू डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मोहित शर्माने हे षटक टाकले. पंतने डावाच्या सलग तीन षटकार ठोकत संघाची धावसंख्या 224 धावांपर्यंत नेली. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यानंतर त्याने शेवटच्या 5 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकार लगावला.

ऋषभ पंतने गुजरात टायटन्सविरुद्ध कठीण परिस्थितीत येऊन संघाचा ताबा घेतला आणि त्यानंतर 224 धावांची मोठी धावसंख्या उभारली. 43 चेंडूंचा सामना करताना त्याने 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 88 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment