IPL 2024 : विराट कोहलीचा पहिल्याच सामन्यात महारेकॉर्ड…! ठरला पहिला भारतीय खेळाडू!

WhatsApp Group

CSK vs RCB Virat Kohli Record : IPL 2024 च्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. जवळपास दोन महिन्यांनंतर फलंदाजी करणाऱ्या कोहलीने आयपीएल हंगामातील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिल्याच सामन्यात ही कामगिरी केली. सहावी धाव पूर्ण करताच त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण केल्या. यासह विराटने वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि शोएब मलिक यांच्या खास क्लबमध्येही स्थान मिळवले आहे. आरसीबीच्या डावाच्या 7व्या षटकात रवींद्र जडेजाच्या पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत कोहलीने ही कामगिरी केली.

विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा आकडा गाठणारा जगातील सहावा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. IPL 2024 च्या पहिल्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने 376 सामन्यात 11994 धावा केल्या होत्या. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा आक्रमक सलामीवीर ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. गेलने 463 टी-20 सामन्यांमध्ये 14562 धावा केल्या आहेत, तर पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक 542 सामन्यांमध्ये 13360 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू पोलार्ड 660 सामन्यांमध्ये 12900 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर ॲलेक्स हेल्स 446 सामन्यांमध्ये 12319 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.

डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 370 सामन्यांमध्ये 12065 धावा आहेत. भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर विराटनंतर रोहित शर्मा येतो, जो 426 टी-20 सामन्यांमध्ये 11156 धावा करणारा कोहलीनंतरचा दुसरा भारतीय आहे. गेलने टी-20 मध्ये 22 तर वॉर्नर आणि विराटच्या नावावर 8 शतके आहेत. रोहितच्या नावावर टी-20 मध्ये 7 शतके आहेत. आयपीएलमध्ये 2 संघांविरुद्ध 1000 धावा करणारा विराट कोहली पहिला भारतीय ठरला आहे.

हेही वाचा – IPL 2024 CSK Vs RCB : रहाणे 3.0…! रचिनसोबत ‘रिले’ कॅच, विराट कोहलीचा खेळ खल्लास, पाहा Video

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी, दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment