IPL 2024 CSK vs RCB : पहिली मॅच, पहिला टॉस…आरसीबीची पहिली बॅटिंग, पाहा Playing 11!

WhatsApp Group

IPL 2024 CSK vs RCB | आजपासून देशातील क्रिकेटचा सर्वात मोठा सण आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झुंज होणार आहे. चेन्नईच्या एमएस चिदंबरम स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात आरसीबीचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अतिशय प्रभावी ठरते. या मैदानावर फिरकीपटू फलंदाजांना खूप त्रास देतात. येथे बहुतेक फक्त कमी धावसंख्येचे सामने पाहायला मिळतात.

चेन्नई हा गतविजेता आहे. हा संघ विक्रमी नवव्यांदा IPL चा सलामीचा सामना खेळणार आहे. त्याशिवाय आयपीएलमध्ये इतर कोणत्याही संघाने इतके सलामीचे सामने खेळलेले नाहीत. चेन्नईची धुरा महेंद्रसिंह धोनीने ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. तर फाफ डु प्लेसिस बंगळुरूचा कप्तान आहे. चेन्नईकडून समीर रिझवी पदार्पणाचा सामना खेळत आहे.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी, दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment