IPL 2024 CSK vs RCB | इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाला आज (22 मार्च) सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यात चेन्नईचा संघ आपल्या नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. याचाच अर्थ आता आयपीएलच्या पहिल्या सामन्याने एका नव्या पर्वाची सुरुवात होणार असून, या सामन्याची कमान आता महेंद्रसिंह धोनीऐवजी ऋतुराज गायकवाडकडे आहे. हा सलामीचा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रात्री 8.00 वाजता खेळवला जाईल.
पाच वेळचा चॅम्पियन आणि गतवेळचा विजेता चेन्नईचा संघ विक्रमी सहाव्या विजेतेपदाकडे डोळे लावून बसला आहे. दुसरीकडे, आरसीबी प्रथमच विजेतेपदावर कब्जा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आयपीएलमध्ये सीएसके आणि आरसीबीचे संघ आतापर्यंत 31 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत चेन्नईने 20 सामने जिंकले, तर बंगळुरूने 10 सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला.
चेन्नईची कमान आता 42 वर्षीय धोनीच्या हातातून निसटून युवा ऋतुराज गायकवाडकडे आली आहे. दुसरीकडे, क्रिकेटची अप्रतिम समज असलेल्या धोनीचे मन पूर्वीसारखेच कुशाग्र आहे, पण वयोमानानुसार त्याची फलंदाज म्हणून चपळता कमी झाली आहे. अशा स्थितीत तरुणांवर कामगिरीची मोठी जबाबदारी असेल.
हेही वाचा – CSK चा कॅप्टन झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “माही भाई…”
श्रीलंकेचा मथिशा पाथिराना बाहेर आहे, बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. 2008 पासून या मैदानावर आरसीबीने चेन्नईला हरवलेले नाही. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात परतणाऱ्या विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी असेल. कॅमेरून ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल हेही संघात आहेत.
संघ पुढीलप्रमाणे आहेत –
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सिंधू, प्रशांत सोलापूर. महिष तिक्ष्णा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावेली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडगे, मयंक डागर, विजय कुमार, दीपकुमार वैशिक, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा