IPL 2024 CSK vs RCB : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 च्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6 गड्यांनी मात दिली आहे. चेपॉकवर रंगलेल्या सामन्यात आरसीबीचा कप्तान फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. डू प्लेसिसची चांगली सलामी आणि मधल्या फळीत अनुज रावत आणि दिनेश कार्तिकच्या भागीदारीमुळे आरसीबीने सीएसकेला 174 धावांचे आव्हान दिले. वेवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने सीएसकेसाठी सर्वाधिक 4 विकेट्स काढल्या. प्रत्युत्तरात चेन्नईकडून रचिन रवींद्र, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी चांगली फलंदाजी केली आणि 18.4 षटकातच विजय मिळवून दिला. 2008 पासून आरसीबीला चेपॉकमध्ये सीएसकेविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही.
सीएसकेचा डाव
आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी 38 धावांची सलामी दिली. ऋतुराज 15 धावांवर बाद झाला. रचिनने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 37 धावा केल्या. ऋतुराजनंतर अजिंक्य रहाणेने 27 धावा केल्या. आरसीबीकडून कॅमेरून ग्रीनने रहाणे त्यानंतर डॅरिल मिचेल (22) अशा दोघांना बाद करत ही जोडी फोडली. नंतर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी संयमी, सावध भागीदारी केली. दुबेने 4 चौकार आणि एका षटकारांसह नाबाद 34 तर जडेजाने नाबाद 25 धावा केल्या. आठ चेंडू ठेऊन सीएसकेने विजय मिळवला. आरसीबीकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक 2 विकेट्स काढल्या.
आरसीबीचा डाव
कप्तान फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी 41 धावांची सलामी दिली. फाफने 8 चौकारांसह 35 धावा केल्या. त्यानंतर मुस्तफिजुरने जबरदस्त स्पेल टाकला. यात त्याने फाफसह, रजत पाटीदार (0), ग्लेन मॅक्सवेल (0) विराट कोहली (21) आणि कॅमेरुन ग्रीन (18) यांना बाद केले. अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी आरसीबीची कमान सांभाळली. दोघांनी 95 धावांची भागीदारी केली. रावतने 4 चौकार आणि 3 षटकारांसह 48 तर कार्तिकने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 38 धावा केल्या. आरसीबीने 20 षटकात 6 बाद 173 धावा केल्या.
दोन्ही संघांची Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी, दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा