IPL 2024 CSK vs PBKS : पंजाब किंग्जचा सीएसकेला धक्का! 7 विकेट्सने चारली धूळ

WhatsApp Group

IPL 2024 CSK vs PBKS : सॅम करनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्याच मैदानात पराभव केला. पंजाबचा हा स्पर्धेतील चौथा विजय, तर चेन्नईचा पाचवा पराभव ठरला. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या पंजाबने फिरकीपटूंच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर चेन्नईला 20 षटकात 162-7 धावांवर रोखले. चेन्नईकडून कप्तान ऋतुराज गायकवाडने संयमी अर्धशतक केले. प्रत्युत्तरात सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि रायली रुसोच्या धावांच्या जोरावर पंजाबने हा सामना 7 गडी राखून जिंकला.

पंजाबकडून जॉनी बेअरस्टोने 7 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा केल्या. तर रुसोने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 43 धावा जमवल्या. शशांक सिंग आणि सॅम करन यांनी विजयी भागीदारी रचली. 18व्या षटकात पंजाबने विजयावर शिक्कामोर्तब केले. करनने नाबाद 26, तर शशांक सिंगने नाबाद 25 धावा केल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने 7 गडी गमावून 162 धावा केल्या. चेन्नईने चांगली सुरुवात केली होती, पण हरप्रीत ब्रारने डावाच्या 9व्या षटकात दोन बळी घेत त्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर चेन्नईने 107 धावांवर 4 विकेट गमावल्या. पण कर्णधार ऋतुराज गायकवाडने एका टोकाला राहून संघाला सांभाळताना शानदार अर्धशतक ठोकले. ऋतुराज 48 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. मात्र त्याने संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. महेंद्रसिंह धोनीने 11 चेंडूत 14 धावा केल्या. आयपीएलच्या या मोसमात तो पहिल्यांदाच आऊट झाला. दुसरीकडे, पंजाबकडून ब्रारशिवाय राहुल चहरने 2 बळी घेतले. तर कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंगने 1-1 विकेट घेतली.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरेल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड गिल्सन आणि मुस्तफिजुर रहमान.

पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रायली रुसो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment