IPL 2024 CSK vs LSG : ऋतुराजचे शतक वाया! मार्कस स्टॉइनिसने पळवला चेन्नईचा विजय

WhatsApp Group

IPL 2024 CSK vs LSG : आयपीएलमध्ये चेपॉक स्टेडियमवर झालेल्या जबरदस्त सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जला 6 गड्यांनी मात दिली. कप्तान ऋतुराज गायकवाडचे शतक आणि शिवम दुबेच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने लखनऊला 211 धावांचे आव्हान दिले होते. मार्कस स्टॉइनिसच्या वादळी शतकाच्या जोरावर लखनऊने शेवटच्या षटकात विजय मिळवला. शेवटच्या षटकात लखनऊला विजयासाठी 17 धावांची गरज होती. चेन्नईकडून मुस्तफिजुर रहमानने हे षटक टाकले. स्टॉइनिसने दोन चेंडूतच हे आव्हान पूर्ण केले. स्टॉइनिसने 63 चेंडूत 13 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 124 धावांची खेळी केली. स्टॉइनिसला निकोलस पूरनची साथ लाभली. पूरनने 34 धावा केल्या. चेन्नईकडून मशिशा पथिरानाने सर्वाधिक 2 विकेट्स काढल्या.

या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनऊने चेन्नईला पहिली फलंदाजी दिली. ऋतुराजचे शतक आणि शिवम दुबेच्या आक्रमक 66 धावांच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 4 बाद 210 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या इतिहासात शतक करणारा पहिला कर्णधार ठरला.

हेही वाचा – साहसी ट्रिपला जाणाऱ्यांसाठी जबरदस् गॅजेट्स, जाणून घ्या फीचर्स!

अजिंक्य रहाणेसोबत ओपनिंगला आलेल्या ऋतुराज गायकवाडने सुंदर फटके खेळले. त्याने नाबाद 108 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकार ठोकले. डॅरिल मिचेल (11), रवींद्र जडेजा (16) यांच्यानंतर आलेल्या शिवम दुबेने फक्त 27 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 66 धावा केल्या. लखनऊची सामन्यादरम्यान गचाळ फिल्डींग पाहायला मिळाली. त्यांनी अनेक झेल सोडले. लखनऊकडून यश ठाकूर, मोहसिन खान आणि मॅट हेन्रीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड(कप्तान), डॅरिल मिचेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिषा पथिराना.

लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, कल राहुल (विकेटकीपर/कप्तान), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment