IPL 2024 : धोनीचा कॅच भारीच, पण अजिंक्य रहाणेचा लय भारी, पाहा Video

WhatsApp Group

IPL 2024 CSK vs GT : चेन्नई सुपर किंग्जला काही दिवसांपूर्वी धोनीचा संघ म्हटले जात होते. पण 17 व्या हंगामापूर्वी धोनीने संघाची कमान युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. असे असूनही धोनीबाबत चर्चा होत आहेत. आता गुजरातविरुद्धच्या सामन्यात धोनीने अप्रतिम झेल घेऊन चर्चेत आला आहे. वयाच्या 42व्या वर्षी हा झेल घेण्यात धोनीने अजिबात संकोच केला नाही. कॅप्टन कूलने झेल घेताच त्याची संपूर्ण मैदानात जल्लोष पाहायला मिळाला. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गुजरातकडून अष्टपैलू विजय शंकर क्रीजवर उपस्थित होता. डेरिल मिशेलने चेंडू टाकला. या चेंडूवर विजयने वेगाने बॅट फिरवली, त्यानंतर चेंडू धोनीपासून दूर जाताना दिसला. पण धोनीने हा अविश्वसनीय झेल शक्य करून दाखवला. यानंतर चेन्नईचे सर्व खेळाडू आनंदाने उड्या मारून माहीचे अभिनंदन करताना दिसले. कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला धोनी या वयातही त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.

हेही वाचा – राशिद खानला पहिल्याच चेंडूवर षटकार, IPL करियरची धडाकेबाज सुरुवात, कोण आहे समीर रिझवी?

धोनीनंतर अजिंक्य रहाणेने खतरनाक झेल टिपला. तुषार देशपांडेच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना डेव्हिड मिलरचा चेंडू हवेत गेला. रहाणेने सूर मारत हा झेल टिपला. रहाणेच्या झेलचेही सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.

गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कप्तान), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, डेविड मिलर, अजमतुल्लाह ओमरजई, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर, मोहित शर्मा, स्पेंसर जॉनसन.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment