IPL 2024 CSK vs GT : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय मिळवला आहे. चेन्नईने गुजरात टायटन्सला 63 धावांनी मात दिली. गुजरातचा कप्तान शुबमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रचिन रवींद्र आणि शिवम दुबेच्या क्लासिक फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने गुजरातला 207 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात गुजरातने सुरुवात चांगली केली, पण ठराविक अंतरावर विकेट्स गमावल्या. शिवाय चेन्नईकडून मथिशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान यांनी धारदार गोलंदाजी केली.
नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावून 206 धावा जोडल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 23 चेंडूत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने शानदार अर्धशतक झळकावले. दुबेने 51 धावा केल्या. कर्णधार ऋराज गायकवाड (36 चेंडूत 46, पाच चौकार, एक षटकार, 46 धावा) आणि रचिन रवींद्र (20 चेंडूत 46, सहा चौकार, तीन षटकार, 46 धावा) यांनी चांगली सुरुवात करून दिली. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच फलंदाजीला आलेल्या समीर रिझवीने राशिद खानला 2 षटकार ठोकले. त्याने 6 चेंडूत 14 धावा केल्या. गुजरातकडून राशिदने सर्वाधिक 2 विकेट्स काढल्या.
हेही वाचा – IPL 2024 : धोनीचा कॅच भारीच, पण अजिंक्य रहाणेचा लय भारी, पाहा Video
चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिल (8) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर वृद्धिमान साहाही फार काळ टिकला नाही. दोघांना चहरने बाद केले. गुजरातकडूव साई सुदर्शनने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने 150 किमीच्या वेगाने गोलंदाजी करत गुजरातच्या फलंदाजांना वेसण घातले. त्याला एक विकेट मिळाली. दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा