IPL 2024 CSK vs GT : चेन्नईचे गुजरातला 207 धावांचे आव्हान, शिवम दुबेची स्फोटक खेळी!

WhatsApp Group

IPL 2024 CSK vs GT : चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा सामना रंगत आहे. या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. सुरुवातीला रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड त्यानंतर शिवम दुबेने जबरदस्त फलंदाजी केल्यामुळे चेन्नईने गुजरातला 207 धावांचे आव्हान दिले आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावून 206 धावा जोडल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 23 चेंडूत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने शानदार अर्धशतक झळकावले. दुबेने 51 धावा केल्या. कर्णधार ऋराज गायकवाड (36 चेंडूत 46, पाच चौकार, एक षटकार, 46 धावा) आणि रचिन रवींद्र (20 चेंडूत 46, सहा चौकार, तीन षटकार, 46 धावा) यांनी चांगली सुरुवात करून दिली. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच फलंदाजीला आलेल्या समीर रिझवीने राशिद खानला 2 षटकार ठोकले. त्याने 6 चेंडूत 14 धावा केल्या. गुजरातकडून राशिदने सर्वाधिक 2 विकेट्स काढल्या.

दोन्ही संघांची Playing 11

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कप्तान), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान.

गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कप्तान), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), विजय शंकर, डेविड मिलर, अजमतुल्लाह ओमरजई, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर, मोहित शर्मा, स्पेंसर जॉनसन.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment