आयपीएल 2024 (IPL 2024) साठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. सर्व संघांनी आपला छावणी मजबूत करण्यासाठी रोडमॅप देखील तयार केला असावा. IPL 2024 साठी मिनी ऑक्शन (IPL 2024 Auction Live Streaming) 24 तासांनंतर सुरू होईल. आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या लिलावात 333 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून त्यात 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. चाहत्यांनाही या ऑक्शनचा मोफत आनंद घेता येईल.
आयपीएल 2024 साठी काही खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत लाखांमध्ये ठेवली आहे, तर काहींनी ती कोटींमध्ये ठेवली आहे. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. याशिवाय 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये आहे. संघांकडे एकूण 77 खेळाडू शिल्लक आहेत. म्हणजे मिनी ऑक्शनमध्ये इतकेच खेळाडू श्रीमंत होऊ शकतात.
हेही वाचा – Business Ideas : 50,000 रुपयांत सुरू करता येणारे व्यवसाय, रोजची कमाई 4-5 हजार!
आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मिनी ऑक्शन प्रथमच देशाबाहेर दुबईमध्ये सुरू होणार आहे. 19 डिसेंबरला दुपारी 1 वाजता ऑक्शन सुरू होईल. हे ऑक्शन जिओ सिनेमावर मोफत पाहता येईल. टीव्हीसाठी स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर ऑक्शनचा आनंद घेता येईल. आयपीएल 2024 मध्ये 333 खेळाडूंवर बोली लावली जाईल, ज्यामध्ये 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडू आहेत. संघांकडे एकूण 77 स्लॉट शिल्लक आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!