आयपीएलच्या इतिहासात प्रथमच खेळणार आदिवासी खेळाडू, धोनीला मानतो आदर्श!

WhatsApp Group

आयपीएल 2024 साठी गुजरात टायटन्स संघाने रॉबिन मिंझ (Robin Minz Story In Marathi) नावाचा यष्टीरक्षक फलंदाज मिनी ऑक्शनद्नारे (IPL 2024 Auction) संघात घेतला आहे. कोणत्याही फ्रेंचायझीकडून बोली लावणारा रॉबिन हा पहिला आदिवासी क्रिकेटपटू आहे. रॉबिन झारखंडसाठी अंडर-19 संघात खेळला आहे आणि त्याने 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह आयपीएल लिलावात प्रवेश केला. लिलावात त्याचे नाव येताच पहिली बोली चेन्नई सुपर किंग्जने लावली. चेन्नईनंतर मुंबईनेही या खेळाडूला खरेदी करण्याची इच्छा दाखवली.

मुंबई आणि चेन्नई यांच्यात 1 कोटी 30 लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती, परंतु त्यानंतर गुजरात टायटन्स संघाने बोलीमध्ये प्रवेश केला. गुजरातने रॉबिनसाठी 1 कोटी 40 लाखांची बोली लावली. यानंतर बोली आणखी पुढे गेली, परंतु मुंबईने 2.60 कोटींच्या बोलीनंतर माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता बोली संपेल असे वाटत होते पण नंतर सनरायझर्स हैदराबाद संघानेही बोलीत उडी घेतली.

सनरायझर्सने रॉबिनवर दोनदा बोली लावली, पण गुजरात टायटन्सने खंबीरपणे उभे राहून 3.60 कोटी रुपयांची शेवटची बोली लावून या आदिवासी खेळाडूचे नशीब उजळले. अशा परिस्थितीत, रॉबिन आयपीएल लिलावात बोली लावणारा पहिला आदिवासी खेळाडू ठरला आणि त्याला 3 कोटींहून अधिक रक्कम मिळाली.

धोनी आदर्श

रॉबिन मिंझ झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील आहे. हा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपला आदर्श मानतो. अनुभवी प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांच्या देखरेखीखाली मिंझ क्रिकेटच्या युक्त्या शिकत आहे. चंचल भट्टाचार्यही धोनीचे मेंटॉर राहिले आहेत. मुंबई इंडियन्सच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली, तेव्हा मिंझ पहिल्यांदा प्रकाशझोतात आला.

हेही वाचा – जन्मतारखेचे प्रमाणपत्र म्हणून आधार कार्ड दाखवता येते का? जाणून घ्या

मिंझ अद्याप झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला नसला तरी तो अंडर-19 आणि अंडर-25 मध्ये राज्य संघाकडून खेळला आहे. मिंझचे वडील लष्करातून निवृत्त झाले आहेत आणि आता ते रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर गार्ड म्हणून काम करतात. सध्या रॉबिन आपल्या दोन बहिणींसोबत नमकुम, रांची येथे राहतो.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment