IPL 2024 Auction ची तारीख, जागा ठरली! 77 खेळाडूंचे नशीब पालटणार

WhatsApp Group

वनडे वर्ल्डकपनंतर बीसीसीआयने पुढच्या आयपीएलची तयारी सुरू केली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंची प्रोसेस 26 नोव्हेंबरला झाली. आता बीसीसीआयने आयपीएल 2024 ऑक्शनची (IPL 2024 Auction) तारीख जाहीर केली आहे. 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये आयपीएल मिनी ऑक्शन होणार आहे,

ज्यामध्ये 77 खेळाडूंच्या जागा भरल्या जातील. आयपीएल लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी नोंदणी केली आहे, ज्यामध्ये 30 विदेशी खेळाडू आणि 47 भारतीय खेळाडू 77 स्लॉटमध्ये निवडले जाणार आहेत.

प्रथमच परदेशात आयपीएलचे ऑक्शन

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हे मिनी ऑक्शन परदेशात आयोजित केले जात आहे. वृत्तानुसार, 10 फ्रेंचायझी आपल्या संघात खेळाडूंचा समावेश करण्यासाठी 262.95 कोटी रुपये खर्च करतील. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रॅव्हिस हेड, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंचाही समावेश असेल. तिघांनीही आपली सर्वोत्तम किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 10 सामन्यांमध्ये 553 धावा आणि 5 बळी घेणारा न्यूझीलंडचा खेळाडू रचिन रवींद्र, कोणत्या संघात जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Today’s Horoscope : ‘या’ राशींच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवन सुखी, वाचा तुमचा आजचा रविवार कसा जाईल

इंडियन प्रीमियर लीगने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर आयपीएल 2024 मिनी ऑक्शनची माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

फ्रेंचायझीकडे शिल्लक पैसे आणि स्लॉट

  • चेन्नई सुपर किंग्ज, रु. 31.40 कोटी, 6 स्लॉट
  • दिल्ली कॅपिटल्स, 28.95 कोटी, 9 स्लॉट
  • गुजरात टायटन्स, रु. 38.15 कोटी, 8 स्लॉट
  • कोलकाता नाइट रायडर्स, रु. 32.70 कोटी, 12 स्लॉट
  • लखनऊ सुपर जॉइंट्स, 13.35 कोटी रुपये, 6 स्लॉट
  • मुंबई इंडियन्स 17.75 कोटी, 8 स्लॉट
  • पंजाब सुपर किंग्ज, 29.10 कोटी रुपये, 8 स्लॉट
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 23.25 कोटी रुपये, 6 स्लॉट
  • राजस्थान रॉयल्स, 14.50 कोटी रुपये, 8 स्लॉट
  • सनरायझर्स हैदराबाद, 34.00 कोटी रुपये, 6 स्लॉट

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment