Ambati Rayudu On RCB : आयपीएल 2024 चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी या दोन्ही संघांनी त्यांचे शेवटचे लीग सामने एकमेकांविरुद्ध खेळले. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला फक्त एक विजय आवश्यक होता आणि आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान 18 धावांनी विजय आवश्यक होता. आरसीबीने हा सामना 27 धावांनी जिंकून प्लेऑफचे तिकीट बुक केले. अशाप्रकारे चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. रायुडू स्वतः सीएसके संघाचा भाग होता आणि या पराभवामुळे तो खूपच निराश झाला. विजयानंतर आरसीबीने मैदानावर जल्लोष साजरा केला, जणू आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला.
धोनी आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी मैदानावर थांबला होता, पण संघ आपल्याच सेलिब्रेशनमध्ये मग्न असल्याचे पाहून तो आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करता ड्रेसिंग रूममध्ये परतला. या प्रकरणावरून बराच वाद झाला होता. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा राजस्थान रॉयल्सने चार गडी राखून पराभव केला होता आणि आरसीबीच्या या पराभवानंतर रायुडू पूर्ण ताकदीने या संघाला ट्रोल करत आहे.
Ambati Rayudu pic.twitter.com/cxZCOJdxJg
— RVCJ Media (@RVCJ_FB) May 24, 2024
हेही वाचा – Gold Silver Price Today : मुंबईत सोन्याचा भाव घसरला, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
रायुडूने आरसीबीबद्दल एक नवीन सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. यात त्याचे लक्ष्य थेट विराट कोहलीवर असल्याचे दिसते. रायडूने म्हटले, ”मला त्या चाहत्यांचे वाईट वाटते जे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला वर्षानुवर्षे उत्कटतेने समर्थन करत आहेत. जर आरसीबी फ्रेंचायझी संघाच्या व्यवस्थापनाने आणि नेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक टप्पे गाठण्याआधी संघाच्या कल्याणाचा विचार केला असता तर आरसीबीने आतापर्यंत अनेक ट्रॉफी जिंकल्या असत्या. या फ्रेंचायझी संघाने किती महान खेळाडूंना सोडून दिले हे लक्षात ठेवा, अशा खेळाडूंना संघात आणण्यासाठी तुमच्या व्यवस्थापनावर दबाव आणा, जे संघाच्या भल्याला प्राधान्य देतील, मेगा लिलावाने एका महान अध्यायाची सुरुवात होऊ शकते.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा