IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गेल्या 16 वर्षांपासून आयपीएल ट्रॉफीची वाट पाहत आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने आयपीएलच्या 17 व्या हंगामात 4 पैकी 3 सामने गमावले आहेत. या संघावर सर्वत्र टीका होत आहे. स्टार्सची भरणा असलेल्या या संघात विराट कोहली, डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे महान फलंदाज आहेत, तरीही संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याआधीही आरसीबी संघात अनेक जागतिक दर्जाचे स्टार होते ज्यात ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांचा समावेश होता. मात्र आजपर्यंत या संघाला अंतिम फेरी गाठता आलेली नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने वरिष्ठ खेळाडूंमुळे हा संघ विजेतेपद मिळवू शकला नसल्याचे म्हटले आहे. रायडूने याचे उदाहरणही दिले आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या चॅम्पियन संघाचा भाग असलेल्या अंबाती रायुडूने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही, परंतु कदाचित तो सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस या तीन वरिष्ठ खेळाडूंचा संदर्भ देत होता. आरसीबीने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोहलीने या मोसमात आतापर्यंत 203 धावा केल्या आहेत परंतु डू प्लेसिसला केवळ 65 धावा करता आल्या असून मॅक्सवेलने केवळ 31 धावा केल्या आहेत.
रायुडूने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, आरसीबीच्या गोलंदाजांनी नेहमीच जास्त धावा दिल्या आहेत आणि त्यांचे फलंदाज एकसंध कामगिरी करू शकत नाहीत. दबावाच्या परिस्थितीत कोण फलंदाजी करत आहे? भारताचा युवा फलंदाज आणि दिनेश कार्तिक. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी नावं असलेल्या खेळाडूंनी दबावाचा सामना करायला हवा होता, पण मग ते कुठे आहेत. मग ते सर्व ड्रेसिंग रूममध्ये बसतात.
हेही वाचा – IPL 2024 DC Vs KKR : केकेआरचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची Playing 11
रायुडू म्हणाला, ”16 वर्षे झाली आणि आरसीबीची तीच जुनी गोष्ट आहे. जेव्हा दबावाची परिस्थिती असते तेव्हा कोणताही मोठा खेळाडू उपस्थित नसतो. सर्व युवा खेळाडू खालच्या क्रमाने फलंदाजी करतात तर सर्व सीनियर खेळाडू वरच्या क्रमाने फलंदाजी करतात. यामुळेच संघाला अद्याप आयपीएल जिंकता आलेले नाही. तुमचे मोठे नाव असलेले खेळाडू वरच्या ऑर्डरच्या जाऊन मलई खातात.” गेल्या सामन्यात आरसीबीचा लखनऊकडून पराभव झाला होता. या सामन्यात आरसीबीचे फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहलीचा हा 100 वा टी-20 सामना होता, जो तो संस्मरणीय बनवू शकला नाही.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा