IPL 2023 Sunil Gavaskar Gets Autograph From MS Dhoni : स्टेडियममधील प्रेक्षकांनी, टीव्हीवर पाहणाऱ्या लोकांनी आयपीएल 2023 मध्ये 14 मे 2023 रोजी खास क्षण पाहिला. असा क्षण जो प्रत्येक क्रिकेटप्रेमीला सारखा पाहतच राहावासा वाटेल. एक दिग्गज क्रिकेटर दुसऱ्या महान क्रिकेटरचा ऑटोग्राफ घेतोय, एकमेकांना कडाडून मिठी मारतोय आणि त्या क्षणाचे सर्वजण साक्षीदार झाले. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा महान कप्तान महेंद्रसिंह धोनीने सर्वांनाच धक्कादायक संकेत दिला. त्याने या संकेतामधून ‘ही माझी शेवटची आयपीएल’ असल्याचे समोर आणले.
यंदाच्या आयपीएलध्ये चेन्नई सुपर किंग्जने चेपॉकच्या मैदानावर प्लेऑफपूर्वीचा शेवटचा सामना खेळला. आता 23 मेला क्वालिफायर-1 चा सामना या मैदानावर होणार आहे, पण यावेळी चेन्नई सुपर किंग्ज खेळणार का याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शेवटची आयपीएल खेळणाऱ्या धोनीसाठी हा सामना भावनिक होता. या सामन्यात चेन्नईला कोलकाताकडून 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. सामन्यानंतर धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्टेडियममध्ये गोल फिरून चाहत्यांनी जर्सी, ऑटोग्राफ केलेले बॉल दिले.
Now THAT'S what we call a wholesome moment 🥹❤️#IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL | @IPL @ChennaiIPL pic.twitter.com/DPlRj0eCrn
— JioCinema (@JioCinema) May 14, 2023
🙏💛💛 pic.twitter.com/S3xigpaSqy
— DHONI GIFS™ (@Dhoni_Gifs) May 14, 2023
Sunil Gavaskar – the fan – running in to get MS Dhoni's autograph 😄#IPL2023 #CSKvsKKR #MSDhoni pic.twitter.com/7yDnSErx1A
— Aadya Sharma (@Aadya_Wisden) May 14, 2023
हेही वाचा – IPL 2023 : कोलकाताचे ‘जय-वीरू’ थालाला नडले..! CSK चा चेपॉकवर 6 विकेट्सने पराभव
Even sunil gavaskar ask for autograph to MS Dhoni ❤️❤️❤️ pic.twitter.com/pAAWM4j71u
— Prayag (@theprayagtiwari) May 14, 2023
…आणि गावसकरांनी धोनीकडे ऑटोग्राफ मागितला!
यावेळी मोठी घटना घडली. मैदानातून सामन्यात कॉमेंट्री करणारे सुनील गावसकर धोनीकडे धावत गेले आणि त्यांनी ऑटोग्राफ मागितला. धोनीनेही त्यांच्या शर्टवर आपला ऑटोग्राफ दिला. या ऑटोग्राफनंतर दोघांनी मिठी मारली. हा क्षण सर्वत्र कैद झाला. एकमेकांप्रती असलेली प्रेमाची आणि आदराची भावना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले. अनेकांनी याला ‘आयपीएल 2023 चा सर्वोत्तम क्षण’ असे म्हटले.