IPL 2023 SRH vs RCB Virat Kohli Century : आयपीएल 2023 च्या 65 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला 8 गड्यांनी सहज मात दिली. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. हैदराबादचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात बंगळुरूकडून विराट कोहलीने कमाल शतक ठोकले.
विराटचे चार वर्षानंतर शतक
विराट कोहलीने 62 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र, शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. कोहलीने 63 चेंडूत 100 धावांची खेळी केली. त्याने 12 चौकार आणि चार षटकार मारले. त्याचे आयपीएलमधील हे सहावे शतक आहे. या शतकानंतर बंगळुरूच्या डगआऊटमधील खेळाडूंनी कोहलीला मानवंदना दिली. विराट कोहलीने 19 एप्रिल 2019 रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध आयपीएलमध्ये शेवटचे शतक झळकावले होते.
💯 Bow down to the greatness of 👑 #ViratKohli 👏
He is now tied with Chris Gayle for the most #TATAIPL hundreds 🔥#SRHvRCB #IPLonJioCinema #IPL2023 #EveryGameMatters pic.twitter.com/OGxWztuhk6
— JioCinema (@JioCinema) May 18, 2023
हेही वाचा – IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या वर गेली RCB…! हैदराबादला हरवलं; विराटची ‘क्लासिक’ सेंच्युरी!
Century moment!!!
Players bowing down to the greatest ever!!
Respect is earned 🤫 pic.twitter.com/f41AKPZQKK— Dy tweets (@Tweets_dy_) May 18, 2023
The whole RCB dugout bowed down to King Kohli. pic.twitter.com/FIDGSX3sr7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 18, 2023
असा रंगला सामना..
हेनरिक क्लासेनच्या शतकामुळे हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. क्लासेनने एकहाती किल्ला लढवला. त्याने 51 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 104 धावांची खेळी केली. बंगळुरूकडून ब्रेसवेलने सर्वाधिक दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात आरसीबीने दोन गडी गमावून 187 धावा केल्या आणि सामना जिंकला. विराटशिवाय कर्णधार फाफ डुप्लेसिसने 71 धावांची खेळी केली.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!