IPL 2023 : 6,6,6,6,6..! एका ओव्हरमध्ये अभिषेक शर्माने खाल्ले 5 Six; पाहा Video

WhatsApp Group

IPL 2023 SRH vs LSG : क्रिकेटमध्ये अनेकदा एकच षटक सामन्याचा निकाल ठरवते. धावा कमी असतील तर विजयाची शक्यता वाढते, पण जास्त मार खाल्ल्यास संघ पराभवाच्या मार्गावर जातो. शनिवारी आयपीएल 2023 च्या 58 व्या सामन्यात असेच काहीसे दिसले, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) एकमेकांसमोर होते. अभिषेक शर्माने टाकलेले षटक हैदराबादला चांगलेच महागात पडले. त्याच्या या षटकात लखनऊने 31 धावा कमवल्या. या षटकामुळे हैदराबादला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 183 धावांचे लक्ष्य ठेवले, ज्याचा पाठलाग लखनऊने 19.2 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केला.

15व्या षटकात हैदराबादची धावसंख्या 114/2 होती. लखनऊला येथून 30 चेंडूत 69 धावांची गरज असल्याने हैदराबादचा वरचष्मा दिसत होता. अशा स्थितीत कर्णधार एडन मार्करामने 16व्या षटकात अभिषेककडे चेंडू सोपवला, त्यानंतर लखनऊने वेग पकडला. 5 षटकारांशिवाय अभिषेकने वाईड बॉलही टाकला. मात्र, मार्कस स्टॉइनिसची विकेट घेण्यात त्याला यश आले. स्टॉइनिसने ओव्हरच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला आणि तिसऱ्या चेंडूवर अब्दुल समदने त्याचा झेल घेतला. स्टॉइनिसने 25 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 40 धावांची खेळी केली.

हेही वाचा – Adipurush : ‘आदिपुरुष’साठी प्रभासने किती पैसे घेतले? जाणून घ्या इतर कलाकारांचेही मानधन!

स्टॉइनिस बाद झाल्यानंतर निकोलस पूरन फलंदाजीला आला. पूरनने येताच आक्रमक पवित्रा घेतला आणि चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकला. अभिषेकने महागडे षटक टाकताच एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. एका षटकात 5 षटकार खाणारा तो आयपीएलमधला दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी राहुल शर्मासोबत हा प्रकार घडला होता. 2012 मध्ये राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध एका षटकात पाच षटकार खाल्ले होते. दुसरीकडे, एकूण विक्रमाबद्दल बोलायचे तर, एका षटकात 5 षटकार खाणारा अभिषेक आयपीएलमधील सहावा गोलंदाज आहे. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयालनेही चालू हंगामात इतके षटकार खाल्ले आहेत. कोलकाता नाइट रायडर्सच्या रिंकू सिंहने यश दयालविरुद्ध पाच षटकार ठोकले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर स्टॉइनिस पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर प्रेरक मंकड आणि पूरन यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची अखंड भागीदारी करत लखनऊला विजय मिळवून दिला. मंकडने 45 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. त्याचवेळी पूरनने 25 चेंडूत 44 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले.

Leave a comment