IPL 2023 SRH vs KKR : जिंकता जिंकता हैदराबाद हरली..! कॅप्टन मार्करमला ‘ती’ चूक नडली

WhatsApp Group

IPL 2023 SRH vs KKR : 30 चेंडूत 38 धावा हव्या असताना कप्तान एडन मार्करम आणि हेनरिक क्लासेनने केलेल्या घोडचुकीमुळे सनरायझर्स हैदराबादला घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला. आयपीएल 2023 मध्ये रंगलेल्या 47व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने हैदराबादला 5 धावांनी हरवले आणि स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले. या विजयाचा हिरो ठरला वरूण चक्रवर्ती. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या षटकात फक्त 9 धावांची गरज होती. वरुणने चक्रवर्तीने अब्दुल समदला या षटकात बाद करत सामना आपल्या बाजूने फिरवला. वरुणने या षटकात फक्त 3 धावा दिल्या.

या सामन्यात कोलकाताचा कप्तान नितीश राणाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीर जेसन रॉय (20), रहमनउल्ला गुरबाज (0) आंद्रे रसेल (24) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. नितीशच्या 42 आणि रिंकू सिंहच्या 46 धावांच्या जोरावर कोलकाताने 20 षटकात 9 बाद 171 धावा केल्या. हैदराबादकडून मार्को जानसेन आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – Goa : गोव्यात न्यूड बीच आहे का, जिथे कपडे घालण्याचे कोणतेही बंधन नाही?

प्रत्युत्तरात हैदराबादकडून अभिषेक शर्मा (9), मयंक अग्रवाल (18) राहुल त्रिपाठी (20) मोठ्या धावा जमवण्यात अपयशी ठरले. एडन मार्करमने किल्ला लढवत 41 धावांची खेळी केली. त्याला हेनरिक क्लासेनची (36) साथ लाभली. हे दोघेच विजय मिळवून देतील असे वाटत होते, पण घडले भलतेच. क्लासेन 15व्या तर मार्करम 17व्या तंबूत परतला आणि हैदराबादने हातातील सामना कोलकाताला देऊन टाकला. वेगवान गोलंदाज वैभव अरोराने मार्करमला झेलबाद केले. तर क्लासेनला शार्दुल ठाकूरने पॅव्हेलियनला रस्ता दाखवला. कोलकाताकडून वैभव आणि शार्दुलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे वरुणने आपल्या 4 षटकाततील शेवटच्या 18 चेंडूत फक्त 8 धावा दिल्या. 20 षटकात हैदराबादला 8 बाद 166 धावांपर्यंत पोहोचता आले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment