IPL 2023 : फक्त 59 धावांत ऑलआऊट..! RCB समोर राजस्थान रॉयल्सचा ‘फुसका’ बार

WhatsApp Group

IPL 2023 RR vs RCB : आयपीएल 2023 मध्ये आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आले. प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सामन्यात बंगळुरूने राजस्थानची भंबेरी उडवली आणि 112 धावांनी मोठा विजय मिळवला. राजस्थानचा संपूर्ण संघ फक्त 59 धावांत गारद झाला. विशाल विजयासह बंगळुरूने पॉइंट टेबलमध्ये 12 गुणांसह आणि +0.166 या नेट रन रेटसह पाचवे स्थान मिळवले आहे.

या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके ठोकली. प्रत्युत्तरात राजस्थानचे स्टार फलंदाज एकेरी धाव काढण्यातच अपयशी ठरले. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर हे शून्यावर बाद झाले. जयस्वालला मोहम्मद सिराजने तर बटलरला वेन पार्नेलने तंबूचा मार्ग दाखवला. त्यानंतर पार्नेलने राजस्थानचा कप्तान संजू सॅमसन (4) आणि जो रूट (10) यांनाही बाद केले. देवदत्त पडिक्कल (4), ध्रुव जुरेल (1) यांनाही काही करता आले नाही. शिमरोन हेटमायरने 4 षटकारांसह 35 धावा केल्या, पण तोही 10व्या षटकात बाद झाला. 10.3 षटकात राजस्थानचा संघ 59 धावांत आटोपला. बंगळुरूकडून पार्नेलने 3 तर माइकल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

हेही वाचा – Gold Silver Price Today : मुंबई, पुण्यात सोन्या-चांदीचा भाव किती? जाणून घ्या आजचा रेट!

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर बंगळुरू संघाने चांगली सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने पहिल्या विकेटसाठी सात षटकांत 50 धावा जोडल्या. मात्र, कोहलीला मोठी खेळी खेळता आली नाही. त्याने 19 चेंडूत 18 धावा केल्या. बंगळुरूने 14व्या षटकात 100 धावांचा टप्पा ओलांडला. डुप्लेसीने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो 55 धावा करून बाद झाला. महिपाल लोमरर एक तर दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला. मॅक्सवेलने आपले अर्धशतक 30 चेंडूत पूर्ण केले. तो 54 धावांवर बाद झाला. एकूण 138 धावांत पाच गडी बाद झाल्यानंतर अनुज रावत आणि मायकेल ब्रेसवेल यांनी भागीदारी केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 34 धावा जोडल्या. रावतने 11 चेंडूत 29 आणि ब्रेसवेलने 9 चेंडूत नाबाद 9 धावा केल्या. 20 षटकात बंगळुरूने 5 बाद 171 धावा केल्या. राजस्थानकडून अॅडम झम्पा आणि केएम आसिफ यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

RR साठी डावातील सर्वात कमी धावसंख्या

  • 58 वि. आरसीबी, केप टाऊन, 2009
  • 59 वि.आरसीबी, जयपूर, 2023
  • 81  वि. केकेआर, कोलकाता, 2011
  • 85 वि. केकेआर, शारजाह, 2021

आयपीएलमधील डावातील सर्वात कमी धावसंख्या

  • 49 – RCB विरुद्ध KKR, कोलकाता, 2017
  • ५८ – आरआर वि आरसीबी, केप टाऊन, 2009
  • ५९ – आरआर विरुद्ध आरसीबी, जयपूर, 2023
  • 66 – DC विरुद्ध MI, दिल्ली, 2017

 

Leave a comment