IPL 2023 : रिंकू सिंह घरी परतला, फॅन्स आशिर्वाद घेण्यासाठी धावले, मग पुढे…

WhatsApp Group

IPL 2023 Rinku Singh : आयपीएल 2023 आता अंतिम फेरीत आहे. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील विजेतेपदाचा सामना आज (29 मे) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे अंतिम सामना नियोजित दिवशी म्हणजेच 28 मे रोजी होऊ शकला नाही आणि तो रद्द करण्यात आला. राखीव दिवस हलवावा लागेल. आयपीएलच्या या मोसमात शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह आणि नूर अहमद यांच्यासह अनेक युवा खेळाडूंनी चमक दाखवली. त्यात रिंकू सिंह सर्वाधिक चर्चेत राहिला.

5 चेंडूत 5 षटकार

यामागे वैध कारणेही होती. गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात रिंकूने शेवटच्या षटकात सलग पाच चेंडूंवर षटकार ठोकून कोलकाता नाइट रायडर्सला ज्या प्रकारे जिंकून दिले ते चाहत्यांना नक्कीच आठवत असेल. या सामन्यात त्याने 21 चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 48 धावा (स्ट्राइक रेट 228.57) करत केकेआरचा विजय शक्य करून दाखवला. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यातही रिंकू चमत्कार’ घडवून आणण्याच्या जवळ आला होता. केकेआरला शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती आणि 7 विकेट पडल्या होत्या. या षटकात दोन षटकार आणि एक चौकार मारून त्याने संघाला विजयाच्या जवळ आणले होते. दुर्दैवाने, केकेआरला षटकात केवळ 19 धावा करता आल्या आणि त्यांनी सामना एका धावेने गमावला. रिंकूने या सामन्यात 33 चेंडूत नाबाद 67 धावा (6 चौकार, 4 षटकार) केल्या.

हेही वाचा – IPL चा एक सामना रद्द झाल्यास किती कोटींचे नुकसान होते? जाणून घ्या!

या दोन्ही खेळींनी सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या रिंकूच्या लोकप्रियतेला कमालीची उंची मिळाली आहे. रिंकूचे वडील यूपीच्या अलीगढ शहरात सिलिंडर पुरवण्याचे काम करतात. रिंकूने स्वत: आर्थिक संकटाच्या काळात झाडू मारणे, पुसणे असे काम केले आहे. मात्र, रिंकू आता क्रिकेट जगतात एक प्रसिद्ध नाव बनले आहे. ‘स्टार फेम’ मिळूनही रिंकूने नम्रता सोडलेली नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये IPL 2023 मधील त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीनंतर खेळाडू आणि लहान मुले रिंकूच्या पायांना स्पर्श करत आहेत आणि लाजाळू रिंकू त्यांना तसे न करण्याचे आवाहन करत आहे. तो म्हणतोय, ”पैर मत छुओ भाई..समझ में नहीं आ रही क्‍या?”

149.52 च्या स्ट्राइक रेटने 474 धावा केल्या

आयपीएल 2023 मध्ये, रिंकूने केकेआरसाठी 14 सामन्यांमध्ये 59.25 च्या सरासरीने आणि 149.52 च्या स्ट्राइक रेटने 474 धावा केल्या, त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय कठीण परिस्थितीतही रिंकूने आपल्या स्वभावाने सर्वांना प्रभावित केले. KKR साठी फिनिशरची भूमिका साकारणाऱ्या या फलंदाजाने आयपीएल 2023 मध्ये 31 चौकार आणि 19 षटकार मारले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment